Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात 30 लाखांचे कोकेन जप्तः पोलिसांनी सापळा रचून उंड्री परिसरातून परदेशी व्यक्तीला...

पुण्यात 30 लाखांचे कोकेन जप्तः पोलिसांनी सापळा रचून उंड्री परिसरातून परदेशी व्यक्तीला घेतले ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी इसमाला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून तब्बल 30 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम वजनाचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

हसेनी मुबीनी मीचाँगा (वय- 35, मु.रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी आहे. तो कामानिमित्ताने भारतात आला आहे. उंड्री याठिकाणी तो सध्या राहत होता. परंतु अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना आढळला. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम 8 (क), 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली आहे.

साडेचार लाखांचे मेफेड्रॉन जप्त

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके व अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण लोहगाव धानोरी रस्त्यावर मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विकीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अारोपी किसन नंदकिशोर लधार (वय- 34, रा. लोहगाव, पुणे, मु.रा. राजस्थान) या अारोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रॉन व 10 हजारांचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments