इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पळसदेव : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शुक्रवारी (२८ जून) पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षक शिक्षकेतरांचा विविध मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माध्यमिक शाळांमधील रिक्त जागांचा अनुशेष भरून काढणे, जुलै अखेर नवीन पदभरती, जुनी पेन्शन योजना यासारख्या अनेक मागण्याकरिता शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी एक वाजता पुणे शहरातील १५ ऑगस्ट चौकातील मुख्याध्यापक भवनापासुन मोर्चाला सुरुवात होणार आहे. १५ मार्च २०२४ चा संच मान्यता आदेश रद्द करून मुख्याध्यापक पद पूर्वी प्रमाणे १०० विद्यार्थी संख्येप्रमाणे असावे, अंशत अनुदानित तुकड्यांना विनाअट वाढीव टप्पा, वेतनेतर अनुदान आदि मागण्या केल्या जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर आणि सचिव प्रसाद गायकवाड यांनी दिली.