Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड: पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई, 7...

पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड: पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई, 7 राज्यांतील 10 मुलींची सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील बालेवाडी परिसरात छापेमारी करत एका हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 7 राज्यांतील 10 मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर 5 दलालांवर पिटा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्क परिसरात एका तारांकीत हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचून राजस्थानी अभिनेत्री आणि 2 उझबेकिस्तानच्या तरुणींना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम, रॉकी कदम, राहुल उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा आणि रोशन यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मागील काही दिवसांत पुणे शहरातील ऑन लाईन वेश्या व्यवसायासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार माहिती काढली असता, बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात एका हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार बालेवाडी परिसरात काही हॉटेल आणि सदनिकांमध्ये संबधित व्यवसाय चालत होता.

सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचून मिटकॉन महाविद्यालयजवळील हॉटेल टॅग हाऊस येथील तीन खोल्यांवर छापा टाकत, पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. यामध्ये दिल्ली राज्यातील गुडगाव आणि नजबगड, उत्तरप्रदेशातील आझमगड, पश्चिम बंगालमधील कोलकत्ता व काशिपुर, आसामधील लिखापानी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, अंधेरी व वाशी, गुजरात वापी आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील या तरुणींची सुटका करण्यात आली. या मुलींना अधिक पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments