Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात हत्येचा थरार! मध्यरात्री रस्त्यात अडवून तरुणाला संपवलं; टोळक्याने कोयत्याने केले सपासप...

पुण्यात हत्येचा थरार! मध्यरात्री रस्त्यात अडवून तरुणाला संपवलं; टोळक्याने कोयत्याने केले सपासप वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करुन निर्घण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कर्वे रोड भागातील डहाणूकर कॉलनी परिसरात गुरुवारी १६ मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय-२२ रा. लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत श्रीनिवास हा मित्रांसोबत मध्यरात्री बाराच्या सुमारास जात होता. कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरात पाच ते सहा जणांनी त्यांना अडवून टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. श्रीनिवाससोबत असणारा व्यक्ती त्या ठिकाणाहून पळून गेला. मात्र, श्रीनिवास टोळक्याच्या तावडीत सापडला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन निर्घणपणे खून केला, त्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी पळून गेले.

दरम्यान, या घटनेनंतर श्रीनिवास याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून श्रीनिवास याचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments