इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घोरपडीतील ढोबरवाडी परिसरात उघडकीस आली. यासंदर्भात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अप्पा कट्टीमणी (३५, रा. ढोबरवाडी, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याची आई येलक्का हनुमंता कट्टीमणी (६१, रा. ढोबरवाडी, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, स्टिव्हन नेगल, विजय इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन यांनी आरोपी स्टिव्हन आणि विजय यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ही रक्कम तसेच व्याजाचे पैसे देण्यावरून आरोपी सचिन याला वारंवार त्रास देत होते. ते पैशासाठी त्याला धमक्या द्यायचे. त्यामुळे सचिन नैराश्यात होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून त्याने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.