इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशातच सायबर चोरट्यांनी घरातून कामाची संधी असे आमिष दाखवून तरुणाची २४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोंढवा परिसरातील येवलेवाडी भागात राहायला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांकडून त्याच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात आला होता. घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी संदेशाद्वारे देण्यात आले होते. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम दिले.
हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला पैसे दिले. पैसे मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. या कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरटे तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेत राहिले.
तसेच तरुणाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तरुणाला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल कलेची आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख तपास करत आहेत.