Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार ! येरवड्यात पहाटे जुन्या वादातून एकावर गोळीबार;...

पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार ! येरवड्यात पहाटे जुन्या वादातून एकावर गोळीबार; ६ जणांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात बंदूकबाजांची पुणे पोलिस आयुक्तांनी झाडाझडती घेतली होती. मात्र, या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी जंगलीमहाराज रस्ता, बुधवारी हडपसर तर गुरुवारी सिंहगड रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुन्यावादातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूलच्या परिसरात घडली.

विकी चंदाले असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चंदाले असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमी आणि आरोपी यांच्यात जुना कारणावरून भांडण आणि वाद होते. तर दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, याच वादातून त्याने विकीवर गोळीबार केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी चंदाले हा रात्री दुचाकीवरुण जात असतांना आकाश चंदाले हा त्याच्या काही मित्रांसोबत आला आणि त्याने विकीला अडवले. या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. यानंतर आकाशने विकीवर पिस्तूल रोखून त्याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी ही विकीच्या पोटाला लागली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खसगी दवाखान्यात उपचार सूर आहेत. त्याची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.

माचिस मागितलं म्हणून एकावर गोळीबार

बुधवार सकाळी हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात एका व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला तर मंगळवारी जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी चौक परिसरात बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आला होता. या दोन्ही घटना ताज्या असतांना गुरुवारी सकाळी पहाटे, एकाने माचिस दिली नाही म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटे सिहंगड रस्त्यावरील भुमकर चौकात २.३० च्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. गणेश गायकवाड (रा. वारजे) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments