इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील एका शेतकऱ्याने डोक्यात स्वतःच गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत असून या आत्महत्येचं कारण समोर आला आहे. कुंजीरवाडा येथील धुमाळ मळा परिसरातील बाळासाहेब कुंजीर या शेतकऱ्याने आजाराला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाळासाहेब निवृत्त कुंजीर हे आपल्या कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहत होते. त्यांना चार वर्षांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना म्युकर मायक्रोसिसची बाधा झाली. त्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला. त्यानंतर त्यांना मधुमेहाचा अधिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते शक्यतो घरातच राहत असत. दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रम असता सर्व घरातील सदस्य तिकडे गेले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर कुंजीर यांच्या मुलाने लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या घडलेल्या प्रकारानंतर कुंजीर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आजारपणाला कंटाळून कुंजर यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.