इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे जिल्ह्यासाठी सन 2025 मधील केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 20147 च्या नियम 5 उपनियम (3) अन्वये या वर्षातील 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
हा निर्णय शिवजयंती बुधवार (19 फेब्रुवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार (14 एप्रिल), महाराष्ट्र दिन गुरुवार (1 मे), गणपती उत्सव, ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशीपर्यंत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, नवरात्री उत्सव 1 व 2 ऑक्टोबर 2 दिवस, ख्रिसमस गुरुवार (25 डिसेंबर) व वर्षाअखेर बुधवार (31 डिसेंबर) पर्यंत. तसेच महत्वाचे कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार 2 दिवस परवानगी दिली जाईल, असे आदेशात नमुद आहे.
वरील नमुद उत्सवाच्या दिवशी सकाळी 6 वा. पासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील करुन पुढील अटींवर परवानगी देण्यात येईल. ध्वनी प्रदुषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (3) अनुपालन करण्यात यावे.
क्षेत्र निहाय ठरलेल्या मयदिपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागु नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांची राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.