Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई, ७२ सिलेंडर...

पुण्यात व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई, ७२ सिलेंडर केले जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : व्यावसायिक गॅसचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी छापा कारवाई करून तब्बल ७२ गॅसच्या टाक्या पकडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी टेम्पो तसेच गॅस टाक्या असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोमनाथ लहु भोजने (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक, मुळ. तुळजापूर) असं अटक केलेल्याचे नाव आहे. तर, टाक्या विक्री करण्यास देणाऱ्या विकास धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगंडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात व्यावसायिक तसेच घरगुती गॅसचा काळा बाजार सातत्याने होत असल्याचे दिसत आहे. घरघुती गॅसमधून व्यावसायिकांना अवैधरित्या इतर टाक्यांमध्ये टाकून गॅस विकला जात आहे. दरम्यान, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते.

त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, वडगाव भाजी मंडई येथून गोयल गंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिलबंद व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैधरित्या विक्री करत आहेत. त्यानूसार, लागलीच उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीच्या तब्बल ७२ गॅस टाक्या आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments