Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात वाघोली, हडपसरमध्ये अपघातात दोघे ठार: घरफोडीत 18 लाखांचा ऐवज लंपास

पुण्यात वाघोली, हडपसरमध्ये अपघातात दोघे ठार: घरफोडीत 18 लाखांचा ऐवज लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात वाघोली आणि हडपसर परिसरात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला.

हा अपघात वाघोलीतील बकोरी रस्त्यावर घडला आहे. शशांक सज्जनराव धाबेकर (वय 20, रा. वाघोली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.

टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात हडपसरमधील मंतरवाडी चौकानजीक घडला. अनंत सोपान वनकळस (वय ४४, रा. वडकीगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. केशव ठोंबरे (वय 34, रा. वाघोली ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपनिरीक्षक एस पवार पुढील तपास करीत आहेत.

घरफोडीत १८ लाखांचा ऐवज लंपास

बाणेर परिसरातील सकाळनगरमध्ये असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 18 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यासोबतच चोरट्यांनी शेजारच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. सविता पाटील (वय ४३, रा. सकाळनगर, बाणेर) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता पाटील कुटूंबियासह सकाळनगर परिसरात राहायला आहेत. २३ फेबुवारीला ते बाहेरगावी गेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा १८ लाखांचा ऐवज चोरून नेला. घरी आल्यानंतर सविताला चोरी झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments