Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात "लव्ह जिहाद'च्या संशयावरून टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाणः वसतिगृहावर नेत तरुणास बॅग...

पुण्यात “लव्ह जिहाद’च्या संशयावरून टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाणः वसतिगृहावर नेत तरुणास बॅग भरून निघून जाण्यास भाग पाडले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात “लव्ह जिहाद’च्या कारणावरून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अन्य धर्मीय तरुणीशी त्याने केलेली मैत्री तोडावी म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनीदेखील गंभीर दखल घेत आरोपींचा तपास सुरू केला आहे.

तक्रारदार तरुण हा पुणे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तो आणि त्याची एक जवळची मैत्रीण पुणे विद्यापीठातील उपाहारगृहात पायी चालत निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी १० ते १२ जणांनी विद्यार्थ्याला अडवले. टोळक्याने दोघांकडे आधार कार्ड पाहून दोघांच्या धर्माबाबत विचारणा केली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतो का, अशी विचारणा करून टोळक्याने तरुणीला बाजूला नेत तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, तर तरुणाला धमकावून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्यात आला. तुमच्या मुलाला घेऊन जा, असे त्यांनी तरुणाच्या वडिलांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments