Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedपुण्यात 'रिल्स'वरून महिलांमध्ये राडा; महिलेचे केस कापून केली पतीला बेदम मारहाण

पुण्यात ‘रिल्स’वरून महिलांमध्ये राडा; महिलेचे केस कापून केली पतीला बेदम मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिल्स काढल्याच्या वादातून चार महिलांनी एका महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण करून तिचे केस कापल्याची घटना घडली आहे. ही घटना विमानतळ परिसरातील खांदेवनगरमध्ये घडली आहे. आरोपी महिलांनी तक्रारदार महिलेचा मोबाइल, दुचाकी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयंचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खांदवेनगरमध्ये राहण्यास आहेत. तिचे रिल्स काढण्याच्या मुद्यावरून आरोपी महिलांसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपी महिला १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या घरात शिरल्या. त्यांनी तिच्यासह पतीला बेदम मारहाण केली. तिचे केस कापून मोबाईल व दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments