Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात राज्य राखीव पोलीस बल भरतीची तयारी पूर्ण, बुधवारपासून होणार सुरुवात; उमेदवारांनी...

पुण्यात राज्य राखीव पोलीस बल भरतीची तयारी पूर्ण, बुधवारपासून होणार सुरुवात; उमेदवारांनी ‘या’ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ आणि २ पुणे येथील रिक्त असणाऱ्या ३१५ आणि ३६२ सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया बुधवार १९ जूनपासून राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ आणि २ येथील परेड ग्राऊंड वर सुरु होणार आहे. सदर भरती प्रक्रियेकरिता सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली असून, उमेदवारांना त्यांच्या ओळखपत्रासह सकाळी पाच वाजता त्यांना नेमून दिलेल्या दिवशी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१. पुणे रामटेकडी येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बिनचूक उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ साठी अलंकारण हॉल येथील प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान एखाद्या दिवशी पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर संबंधित उमेदवारांना त्यानंतरची तारीख दिली जाणार आहे.

तसेच काही उमेदवारांना इतर वेगळ्या पदांकरिता जर एकाच दिवशी मैदानी चाचणीची सुचना प्राप्त झालेली असेल तर त्यांना MAHA-IT कडून दुसरी तारीख देण्यात येईल. जर उमेदवारांना इतर काही अडचण असेल, तर या कार्यालयाकडून त्याचे निरसन केले जाईल. सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीकरीता सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरल्यानंतर उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येणार आहे.

मैदानी चाचणीची सर्व तयारी झाली असून उमेदवारांना MAHA-IT Website वरुन प्राप्त प्रवेशपत्र, तसेच आधार कार्ड, फोटोग्राफ आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह भरतीसाठी उपस्थित रहावयाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments