इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील मुठा नदीच्या पात्रात गुरुवारी (ता. 14) ज्येष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वेने धडक दिल्यामुळे महिलेचा मृतदेह रेल्वे रुळावरुन खाली पडला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
सुहासिनी सुधीर देसाई (वय-78, रा. विवेकानंद सोसायटी, सिंहगड रस्ता, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कामगार पुतळा परिसरातील मुठा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली आहे. सुहासिनी देसाई यांचा अपघात आहे की आत्महत्या या बाबी गृहीत धरुन तपास करण्यात येत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी महिलेची पर्स, दागिने आणि मोबाईल आढळून आला आहे. पर्समधील आधारकार्डच्या आधारे महिलेची ओळख पटविली. त्यानंतर पोलीसांनी महिलेच्या नातेवाईकांना कळविले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.