Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेची मनपा ठेकेदाराला मारहाण, वसतिगृहाच्या कामाचे टेंडर कोणीही भरू...

पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेची मनपा ठेकेदाराला मारहाण, वसतिगृहाच्या कामाचे टेंडर कोणीही भरू नये, असा होता आग्रह

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील कामाचे टेंडर मिळण्यासाठी तयार केलेली रिंग तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि राष्ट्रीय पक्षाबरोबर कायम असणाऱ्या ठेकेदाराला भाजपच्या माजी नगरसेविकेने मारहाण केली. गुरुवार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार पालिकेच्या भवन विभागात घडला.

सुरुवातीला माहिती अधिकारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची माहिती पुढे आली होती. नंतर संबंधित ठेकेदार हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले. पालिकेत नगरसेवकांची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्याने सध्या प्रशासकीय राजवटीनुसार कामे सुरू आहेत. त्यात गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामांची टेंडर ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेली आहेत. आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामाचे टेंडर इतर कोणीही भरू नये, असा या माजी नगरसेविकेचा आग्रह होता. मात्र, मारहाण झालेल्या ठेकेदाराने याबाबतचे टेंडर भरले होते. हा प्रकार घडला, तेव्हा त्या ठिकाणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपाचे तुषार पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments