Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज कार 'सीरम इन्स्टिट्यूट'च्या मालकीची; पोलीस तपासात माहिती समोर

पुण्यात बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज कार ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या मालकीची; पोलीस तपासात माहिती समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताची चर्चा देशभरात झाली.

यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर संपूर्ण अग्रवाल कुटुंब समोर आलं होतं. त्यानंतर आता आज झालेल्या अपघातातील मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहिती देखील समोर आली आहे.

केदार मोहन चव्हाण (वय-४१) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्वांच्या डोळ्यासमोर दुचारीकीस्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

केदार चव्हाण हे गोल्फ कोर्स चौकातून आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून मर्सिडीज बेंज गाडी भरधाव वेगात येत होती. नंदू अर्जुन ढवळे हा चालक गाडी चालवत होता.

त्याला गाडीचा वेग नियंत्रणात आणता आला नसल्यामुळे केदार चिरडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली.

मर्सिडीज कार ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या मालकीची

आरोपी कारचालक नंदू ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता अपघातग्रस्त मर्सिडीज कार (MH12 NE 5188) ही सीरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments