इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअर तरुणाने बसमधून प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीकडे पाहून हस्तमैथुन केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अभिनेत्रीकडे पाहून बसमध्येच हस्तमैथुन..
मिळालेल्या माहितीनुसार, 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही संतापजनक घटना बुधवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरांतील नराधम आरोपी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. सध्या तो पुण्यातील आंबेगाव परिसरात राहायला आहे. बुधवारी रात्री तो शिरवळवरून पुण्याच्या दिशेनं बसमधून येत होता. त्याच बसमधून एका अभिनेत्री देखील प्रवास करत होती. यावेळी आरोपीनं पीडित अभिनेत्रीकडे पाहून बसमध्येच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पीडित अभिनेत्रीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीनं पोलीस स्टेशनमध्ये नराधम तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपिला पुण्याच्या आंबेगावर परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.