Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात पोलिसांची नजर चुकवत पळून जाणारा आरोपी जेरबंद

पुण्यात पोलिसांची नजर चुकवत पळून जाणारा आरोपी जेरबंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मारामारीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने रविवारी (दि. २३) दुपारी बाजीराव रस्त्यावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या साहाय्याने त्याला तत्काळ जेरबंद केले. जयेश ऊर्फ जयड्या दत्ता धावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत पद्मावती, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहर व उपनगरांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींनाही तत्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही महिन्यात आठवड्यातून दोन वेळा कोम्बिंग ऑपरेशन केले जाते.

तसेच, पोलिसदप्तरी नोंद असलेल्या व कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हे दाखल झालेल्या प्रत्येक संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतात. अरण्येश्वर परिसरात शनिवारी (दि. २२) झालेल्या किरकोळ मारामारीतील एका युवकाला रविवारी अटक केली. त्या रविवारी विशेष न्यायालयात नेले जात होते. त्या वेळी पोलिसांची नजर चुकवून त्याने वाहनातून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. रविवारच्या सुटीमुळे बाजीराव रस्ता व लगतच्या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला शनिपार परिसरात जेरबंद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments