Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला, तेव्हा गाडीत एका आमदाराचाही मुलगा होता; काँग्रेस...

पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला, तेव्हा गाडीत एका आमदाराचाही मुलगा होता; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते. यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, हे समोर आले पाहिजे. असे विधान नाना पाटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाना पटोले मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे अपघात प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

नाना पाटोले म्हणाले, पुण्यातील कल्याणीनगर भागातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्र राज्यात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले, असा हल्लबोल नाना पाटोले यांनी केला.

ससून ड्रग्ज माफियांसाठी हॉटेल बनलंय : पाटोले

तसेच ललित पाटील प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले, ससून कशाप्रकारे ड्रग्ज माफियांसाठी हॉटेल बनलं आहे, हे समोर आले होते. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्येही अशीच घटना घडली. नशेच्या अंमलाखाली दोन मुलींनी दोन जणांना उडवले, त्यादेखील सुटल्या.

जळगावमध्येही अशाच एका घटनेत आरोपी दहा तासांमध्ये सुटला. हे सर्व आरोपी श्रीमंत घरातील होते. पुण्यातील डॉ. तावरे प्रकरणात काही मंत्र्यांचीही नावे समोर येताना दिसत होते. गृहमंत्री याबाबत आता काय करणार? याची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

पुढे म्हणाले, रवींद्र धंगेकर गेल्या वर्षभरापासून पब संस्कृतीविरोधात लढा देत आहेत. मग या घटनेनंतरच ३६ पब का पाडले? अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. हेच का अजित पवारांचे कडक शासन ? असं म्हणत अजित पवार यांच्यावर देखील नाना पटोले यांनी जोरदार टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments