Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पुन्हा सापडलं मोठं घबाड..! खेड शिवापूरनंतर हडपसरमध्ये बावीस लाखांची रोकड पोलिसांनी...

पुण्यात पुन्हा सापडलं मोठं घबाड..! खेड शिवापूरनंतर हडपसरमध्ये बावीस लाखांची रोकड पोलिसांनी पकडली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीअसून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कोणताही गौरव्यवाहार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहरात नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. याच दरम्यान, पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील हडपसर परिसरात पुन्हा एकदा मोठं घबाड पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

हडपसर- सोलापूर रोडवर नाकाबंदीदरम्यान आज दुपारच्या सुमारास एका गाडीमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रक्कम सापडली आहे. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून या गाडीची तपासणी सुरू असताना त्यामध्ये एवढी रक्कम मिळून आली आहे. ही रक्कम किराणामाल दुकानाच्या होलसेल व्यापाऱ्याचे बिल आहे, असं पोलिसांना सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांकडून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता ही बावीस लाखांची रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments