Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब चालवणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. त्याशिवाय बिअर बार, परमिट रुम, रेस्टॉरंटसाठी सीआरपीसी १४४ नुसार नियमांद्वारे कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरात १४४ नुसार ऑर्डर काढली जाणार असून बेकायदेशिरित्या नियमभंग करीत सुरू ठेवणारे बार, परमिट रुम, रेस्टोरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंटला नोटीस दिली जाणार आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहणार असून त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

दरम्यान, रुफटफ व टेरेस हॉटेल चालकांना दारु विक्री करता येणार नाही. जर विनापरवाना दारुची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. रुपटफ व टेरेस हॉटेलमध्ये परवानगी असल्यास रात्री १० वाजेपर्यंत म्युजिक व डिजे वाजविता येणार आहे. त्याशिवाय जे डिजे कलाकार बाहेरुन येऊन सादरीकरण करणार आहेत, त्यांनी १५ दिवस आधी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

हॉटेल परिसरात सीसीटीव्हींचे जाळे बंधनकारक

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते त्याठिकाणीही (वॉशरुम सोडून) सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक केले आहे. हॉटेलमधील सीसीटीव्हींचे चित्रीकरण डेटा जपण्यासाठी चालकांनी दोन डिव्हीआर गरजेचे आहे. जेणेकरुन एक डिव्हीआर पोलिसांनी तपासणीसाठी नेला तर दुसऱ्या डीव्हीआरमध्ये चित्रीकरण सुरु राहील.

दरम्यान, काही हॉटेलमध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षकांचे ( बाउन्सर) पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. मागील १० वर्षांतील गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्यांची नियुक्ती करावी. जर संबंधितांचे क्रिमिनल रेकॉर्ड असेल आणि त्यांना कामावर ठेवायचे असेल तर संबंधित पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्य स्मोकिंग झोन असणे आवश्यक असून इतर ठिकाणी सिगारेट ओढता येणार नसल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments