Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पडला सशस्त्र दरोडा ! मास्क घालून आलेल्या सात जणांनी लुटले सोन्याचे...

पुण्यात पडला सशस्त्र दरोडा ! मास्क घालून आलेल्या सात जणांनी लुटले सोन्याचे दुकान; 20 ते 30 लाखांचा मुद्देमाल लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यामध्ये एका सोन्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. टू व्हिलरवरून आलेल्या सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दुकान लुटले आहे. पुण्यातील मोहम्मदवाडी रोडवर ही घटना घडली आहे. वारकर मळा येथील बीजीएस ज्वेलर्सवर मास्क लावून आलेल्या सात अनोळखी दरोडेखोरांनी दरोडा टाकत ३० ते ४० सोने नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दरोड्यात अंदाजे २० लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

दरोड्यात २० लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल लुटून दुचाकीवरून आलेले आरोपी पसार झाले आहेत. त्यानंतर वानवडी विभागाचे डीसीपी आर. राजा आणि गुन्हे शाखेचे डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळी भेट दिली आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी केला आहे. तसेच दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे पोलिस आरोपीचा तपास करत आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिसांकडून अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments