Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम काढण्यावरून मोठा तणावः पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर ट्रस्टच बांधकाम...

पुण्यात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम काढण्यावरून मोठा तणावः पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर ट्रस्टच बांधकाम काढणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कसबा पेठेतील पुणेश्वर मंदिराजवळील धार्मिक स्थळ परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरली. त्यामुळे मध्यरात्री पाच ते सहा हजारांचा जमाव एकत्र येऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त या भागात तैनात केला.

पोलिस अायुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अावाहन केले. त्यानंतर संबंधित नागरिकांची समजूत पोलिसांनी काढल्यावर जमाव घरी परतला. त्यानंतर शनिवारी याबाबत पोलिस अायुक्तलयात मनपा अधिकारी, धार्मिक स्थळाचे ट्रस्टी व पोलिसांत सुमारे दोन तास बैठक पार पडली. यामध्ये ट्रस्टतर्फे अनधिकृत बांधकाम काढून घेतले जाईल, असा निर्णय घेतला गेला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल अडीच हजारांचा पोलिस फौजफाटा या ठिकाणी तैनात केल्याने या परिसरास छावणीचे रूप प्राप्त झाले. शुक्रवारी रात्री या ठिकाणी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला. त्यामुळे या ठिकाणी कोणता गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. त्यामुळे या भागात कारवाई होणार असल्याचा समज होऊन कुंभारवाड्यासह धार्मिक स्थळ परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले.

केवळ अफवाच : अमितेशकुमार

याबाबत अमितेशकुमार म्हणाले, या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून येथे कारवाई करण्याची अफवा पसरल्याने जमाव जमला होता. परंतु रात्रीत अशा प्रकारची कोणती कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात अाले. याबाबत शनिवारी पोलिस अायुक्तालयात संबंधितांची बैठक घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात अाले. कुणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पोलिसांचा २४ तास बंदोबस्त

या भागातील काही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे मनपाचे अादेश अाहेत. न्यायालयानेही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अादेश दिल्यावर मनपाने यात पुढाकार घेतला. अनेक वेळा नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम काढले जात नसल्याने तसेच काही राजकीय पक्षांनी व संस्थांनी या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे, अशी मागणी लावून धरल्याने या ठिकाणी पोलिसांचा २४ तास मोठा बंदोबस्तही तैनात असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments