Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखलः फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीचा गळफास...

पुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखलः फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

क्लासला येताना जाताना अल्पवयीन मुलीशी सातत्याने प्रत्यक्ष व सोशल मिडीयाद्वारे संपर्कात राहुन तिचा पाठलाग केला. तसेच तिच्या इच्छेविरोधात फोटो काढून ते समाजामध्ये व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भासरती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.

याप्रकरणी तिला आत्महत्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अजिंक्य आवटे व सृजल खुणे या दोघांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंग धमकावणे व पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 ते 13 मार्च 2024 दरम्यान घडला. याबाबत तिच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क येथे तरूणींचा विनयभंग

कोरेगाव पार्क येथील लेन नंबर दोन येथे फिरणाऱ्या तरूणींना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून एका तरूणीच्या पार्श्वभागावर मारहाण करून दुचाकीवर पळून जाणाऱ्या अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 23 वर्षीय तरूणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी आणि तिची मैत्रीण रस्त्याने फिरत असताना आरोपी हा त्याच्या दुचाकीवरून आला. त्याने तरूणींना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून त्यातील फिर्यादीच्या सिटवर मारहाण करून तो पळून गेला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

आजीला इफ्तारीचे खाद्य घेऊन चाललेल्या अल्पवयीन मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग करून तसेच फोन करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या एकावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहिद जाकीर शेख (20, रा. जाधव वस्ती, घोरपडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

विनयभंग, मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

महिलेला मोबाईल नंबरची मागणी करून तसेच तिचा विनयभंक करून तिने आरडा ओरडा केल्यानंतर बाहेर आलेल्या पतीला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाण, धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार सुनील वाईकर (रा. आशानगर, हौसिंग सोसायटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार आशानगर हौसिंग सोसायटी येथे घडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments