Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात दादागिरी; गुंड स्थानबद्ध, नागपूर जेलमध्ये वर्षभर मुक्काम

पुण्यात दादागिरी; गुंड स्थानबद्ध, नागपूर जेलमध्ये वर्षभर मुक्काम

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वाकडेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए अन्वये कारवाई करून स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. अजमेर जावेद शेख (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे या गुंडाचे नाव आहे.

अजमेर शेख याने आपल्या साथीदारांसह पाटील इस्टेट परिसरात कोयता, रॉड, चाकू अशा हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पीसीबीचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर केला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी प्रस्तावाची पडताळणी करून शेख याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ७८ अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments