Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात दररोज अपघातात एकाचा जातोय बळी; वर्षभरात तब्बल १ हजार २३१ अपघात

पुण्यात दररोज अपघातात एकाचा जातोय बळी; वर्षभरात तब्बल १ हजार २३१ अपघात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: वाहनांची वाढती संख्या अन् सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे पुणेकरांचा जीव गुदमरून जात असताना शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातात सरासरी दररोज एका पुणेकराला प्राणास मुकावे लागत आहे. वर्षभरात शहरात १२३१ अपघात झाले असून, २०२२ च्या तुलनेत तब्बल ३५९ अपघात वाढले आहेत.

पुणे शहरात दररोज शेकडोने वाहनांची भर पडत आहे. त्यात मेट्रोची कामे सुरू असल्याने अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीला नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या कोंडीतून बाहेर पडल्यावर उपनगरांमध्ये वाहनांचा वेग आपसूक वाढतो. त्यातून शहरात प्रवेश करणाऱ्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडलेल्या दिसून येत आहे. मध्य वस्तीतील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त असले तरी त्याचा परिणाम या परिसरात अपघाताचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

शहरात गेल्या वर्षभरात ३१७ प्राणघातक अपघात झाले असून, त्यात ३३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ६२० गंभीर अपघात झाले असून, त्यात ७०९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १५७ किरकोळ अपघात घडले असून, त्यात १९३ जण जखमी झाले आहेत. १३७ अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते. या अपघातात सर्वाधिक पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल दुचाकीस्वार अपघातात सापडले आहेत.

अपघातावर नियंत्रण राहावे यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक नियम तोडण्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असली तरी त्यांना न जुमानता वेगाने वाहने जात असल्याचे या अपघातांच्या संख्येवरून दिसून येत आहे.

अडीच लाख वाहने उचलली

नो पार्किंगमध्ये वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा आणणारी वाहने टोईंग करून उचलली जातात. त्यात प्रामुख्याने दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या वर्षभरात टोईंग वाहनांनी तब्बल २ लाख ६६ हजार ३५७ वाहने उचलण्यात आली. त्यांच्याकडून १५ कोटी १४ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही मार्फत ४ लाख २८ हजार ६१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यावर ३६ कोटी ८३ लाख ९७ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी डिव्हाईस मार्फत ३ लाख ३८ हजार ३५३ वाहनांवर कारवाई करून त्यांना २६ कोटी २८ लाख ९१ हजार ५५० रुपयांचा दंड केला आहे. वेगवेगळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ३३ हजार ३२५ वाहनांवर पोलिसांनी गत वर्षभरात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून तडजोडीअंती ७८ कोटी २६ लाख ९१ हजार ३५० रुपये दंड वसूल केला आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments