Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात टास्कच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक: पोलिसांकडून वर्षानंतर गुन्हा दाखल

पुण्यात टास्कच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक: पोलिसांकडून वर्षानंतर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मागील काही काळात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरात केवळ एक वर्षात तब्बल 26 हजार सायबर गुन्हयांचे तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहे. अपुरे मनुष्यबळामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या सायबर गुन्हयांचा तपास करणे अशक्य बनले असल्याचे दिसून येत आहे.

एका संगणक अभियंत्याची टास्कच्या बहाण्याने तब्बल 27 लाख 51 हजार रुपयांची एक वर्षापूर्वी ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांनी कामाचे ताणाने तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी चतुश्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

याप्रकरणी अभय भास्कर आमलेकर (वय-44, रा. बाणेर, पुणे) यांनी अज्ञात टेलिग्राम आयडी धारक व विविध बँक खातेधारक यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 11/2/2023 ते 13/2/2023 यादरम्यान आनलाइन स्वरुपात घडला आहे. तक्रारदार अभय आमलेकर हे त्यांचे राहते घरी असताना, त्यांना टेलिग्रामच्या माध्यमातून एकाने संर्पक केला. टेलिग्रामच्या माध्यमातून वारंवार संर्पक करत, टास्कच्या बहाण्याने अल्पावधीत तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.

त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करण्यास सांगून सुरुवातीला काही प्रमाणात गुंतवणुकीवर परतावा देऊन विश्वास प्राप्त करण्यात आला. अधिक नफा कमविण्यासाठी वेगवेगळ्या मोठ्या रकमेचे गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्याबदल्यात कोणता परतावा किंवा मुळ गुंतवणुक रक्कम परत न करता 27 लाख 51 हजार रुपयांचा आनलाइन गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.

टास्कच्या अमिषाने साडेचार लाखांची फसवणूक

मुंढवा येथे राहणाऱ्या शिल्पा अरुण हारोडे (वय-40) या राहते घरी असताना अज्ञात मोबाईल धारकाने त्यांच्याशी संर्पक साधला. त्यांना टेलिग्राम ग्रुपवर पुढे वेगवेगळ्या टेलिग्राम आयडी धारकांनी संर्पक करत, त्यांचा विश्वास संपादन केला.

जास्त परताव्याचे अमिष दाखवून त्यांना वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास भाग पाडून त्यांना विविध बँकेच्या खात्यात चार लाख 66 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून सदर रकमेचा कोणताही परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे दोन महिन्यानंतर हा गुन्हा विलंबाने दाखल केला असून पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments