Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून अडीच कोटींचे दागिने लंपास

पुण्यात खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून अडीच कोटींचे दागिने लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : खातेदाराचे बँकेतील लॉकर परस्पर उघडून दोन कोटी ६५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २३) उघडकीस आला. याप्रकरणी लष्कर भागातील एका बँकेच्या व्यवस्थापक महिलेसह सराफी पेढीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यश केशवलाल कपूर (वय ४६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंदर शहानी, तसेच सराफी पेढीचे मालक सतीश पंजाबी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बँकेने नियमांचे पालन न करता लॉकर उघडले व लॉकरमधील दोन कोटी ६५ लाख रुपयांचे दागिने सराफ सतीश पंजाबीला दिले. पंजाबीने दागिने परस्पर वितळविले. पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितविळण्यात आल्याचेही कपूर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. तपासासाठी पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments