Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात खळबळ..! जबरदस्ती शारीरिक संबंध अन् लग्न, तरुणीचा सोबत राहण्यास नकार; एकतर्फी...

पुण्यात खळबळ..! जबरदस्ती शारीरिक संबंध अन् लग्न, तरुणीचा सोबत राहण्यास नकार; एकतर्फी प्रेमातून घडलं भयंकर…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यात एका तरूणाने जबरदस्तीने लग्न करण्याच्या उद्देशाने पीडित तरूणीला सातत्याने त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पीडित तरुणीकडे 50 लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्याने तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिली. रोहित कांबळे (वय 24 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि पीडित तरूणी हे दोघेही पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. आरोपीने पीडित तरूनीसोबत तीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच तिच्याकडे 50 लाख रूपयांची मागणी केली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी तरुण एकतर्फी प्रेम करत होता. पीडित तरूणीने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडितेला मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी लग्न केले. तरीही पीडित तरुणी आरोपीसोबत राहण्यास तयार नसल्याने त्याने पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो तिच्या वडिलांना पाठवले. तसेच पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments