Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात खळबळ, एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

पुण्यात खळबळ, एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान BDDS पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे. असे असले तरी सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळा देवी मंदिरामागे एका पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथे हॅन्ड ग्रॅनाईट आढळल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

पुढे पोलिसांनी BDDS पथकाला पाचारण केले. सदरची वस्तू धोकादायक असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 यांच्या परवानगीने हे ग्रेनाईट नष्ट केले आहे. याबाबतची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments