Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात खरेदीच्या बहाण्याने पावणेचार लाखांचे दागिने पळवले

पुण्यात खरेदीच्या बहाण्याने पावणेचार लाखांचे दागिने पळवले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी (दि. ३१) वडगाव शेरी परिसरात उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे.

वडगाव शेरीतील या पेढीत तीन चोरटे खरेदीच्या बहाण्याने शिरले. त्यांनी पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. त्याचे लक्ष दुसरीकडे वेधून चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले. दागिन्यांची मोजदाद करताना गुरुवारी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments