इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात खून, हाणामारी, अत्याचार अशा गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता पुण्यातील भर रस्त्यात हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटात तुफान हाणामारी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिबेवाडी पोलिसांच्या हद्दीत तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये एकाने हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणावर तो उगारला आहे. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पुण्यातील सराईत गुन्हेगार अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वीही अशाप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरु केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बिवडेवाडी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत.
दरम्यान पुणे पोलिसांनी अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. गुन्हेगारीचा रेकॉर्ड लक्षात घेता कोर्टाने आरोपी भिसे आणि पवारसह सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे