Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात कोयते हातात घेऊन टोळक्याची दहशतः बिबवेवाडी परिसरात तरुणावर धारदार कोयत्याने वार

पुण्यात कोयते हातात घेऊन टोळक्याची दहशतः बिबवेवाडी परिसरात तरुणावर धारदार कोयत्याने वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. एका टोळक्याने तरुणावर धारदार कोयत्याने वार करून दहशत माजविल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी गुंडासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवीण अशोक बनसोडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी, आंबेगाव, कात्रज), चिक्या लोखंडे (रा. धनकवडी) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज संतोष कोल्हे (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी ओंकार, चिक्या यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

आरोपी ओंकार आणि चिक्या यांचा प्रवीण बनसोडेशी वाद झाला होता. प्रवीण अप्पर इंदिरानगर परिसरातील एका दुकानात रात्री आठच्या सुमारास गेला होता. त्यावेळी आरोपी ओंकार, चिक्या आणि त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे कोयते होते. आरोपींनी प्रवीण याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. प्रवीण तेथून पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावले. पोलिस उपनिरीक्षक विवेक सिसाळ तपास करत आहेत.

खराडीतील संत तुकारामनगर, लोहगाव, येरवडा भागात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणांमुळे सामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments