Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात कोयता गँगची दहशत; टोळक्यांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, धारदार कोयत्याने वार

पुण्यात कोयता गँगची दहशत; टोळक्यांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, धारदार कोयत्याने वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेल्या काही दिवसापासून शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत चालली आहे. भर रस्त्यात होणारे हल्ले आणि खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता पुण्यातील दत्तवाडी परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरात रस्त्यावर तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारदार हत्यारे घेऊन सात ते आठ जणांच्या टोळके धावत होते. जीव वाचवण्यासाठी तरुण आकांताने धावत होता मात्र रस्त्यावर त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. इतक्या त्याच्या पाठीमागून हातात कोयता घेऊन आलेल्या एकाने त्याच्यावर वार केला. त्यानंतर इतरांनाही त्या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. शहरातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान तरुणावर झालेला हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासून समोर आली आहे. दत्तवाड पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments