इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीसे वातावरण निर्माण झाले असून पुणे शहरातील गुंडगिरी मोडून कोण काढणार? असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे. आता पुन्हा एकदा शहरात गजा मारणे टोळीचा उन्माद दिसून आला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सोशल मीडिया सांभाळणाऱ्या व्यक्तीस गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आली असून
या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे. हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती समोर आली असून स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडिओ कॉल करून जखमीची विचारपूस केली आहे.. मात्र सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे. याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
नुकतीच याआधीही पुण्यातील एका पोलिसाला मारहाण करण्यात आली होती. शहरात वाहनाच्या तोडाफोडीच्या सुद्धा अनेक घटना घडत असतात. एकाच वेळी अनेक वाहनांशी तोडफोड तसेच स्थानिक गुन्हेगारी वाढत चालले असल्याने तसेच टोळीचा वाढता धुमाकूळ यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.