Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात कारवाईची अफवा पसरवून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 13 जणांविरुद्ध गुन्हा...

पुण्यात कारवाईची अफवा पसरवून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्त्यावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असल्याची खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांतता बिघडवने प्रयत्न करणाऱ्या १३ जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री छोटा शेख सल्ला दर्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियात पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण कसबा परिसरात जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे समाजमाध्यमातून अफवा परसल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या भागात दीड हजारपेक्षा अधिक पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

समाजमाध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सुभाष जरांडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मध्यभागातील कसबा पेठेत तणाव निर्माण झाल्यानंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पुणे शहरातील प्रमुख मंदिरे, तसेच प्रार्थनास्थळांच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पोलीस आदेशाचा भंग प्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा

कसबा पेठेतील शेख सल्ला दर्गा परिसरात बेकायदा जमाव जमवून पोलीसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रमोद जगताप यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक एम पाटील पुढील तपास करत आहेत. शुक्रवारी रात्री शेख सल्ला दर्गा परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. आदेशाचा भंग करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, तसेच जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments