Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, भररस्त्यात पोलिसांसमोर कोयत्याने मारामारी

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, भररस्त्यात पोलिसांसमोर कोयत्याने मारामारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कोयता गैंग (Koyta Gang) एखाद्या कादंबरीतील कथानकाप्रमाणे दहशद माजवत आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी गाड्यांवर कोयत्याने वार करून पोलिसांना आव्हान दिले. आता त्या पूढे जात थेट पोलिसांसमोरच कोयता गँगचे सर्रासपणे भररस्त्यात कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांसमोर घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. कोयता गँगचा वाढत चाललेला हैदोस पोलिसांचे अपयश दाखवत आहे. नुकताच दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या वडगाव शेरी भागात समोर आहे.

पोलिसासमोर घडली घटना

या मारामारीत तीन तरुण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडला त्यावेळी एक महिला पोलीस तिथेच उपस्थित होती. आरोपी तरुण महिला पोलिसांसमोर पीडित तरुणांवर कोयत्याने वार करत होते. तसेच दगडाने मारहाण करत होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना अशा घटना वारंवार घडत आहेत.

याआधी फोडल्या होत्या कारच्या काचा

या पुणे शहरातील वारजे कॅनॉल रस्त्यावर कोयता गँगकडून 7 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली होती वारजे रामनगर कॅनॉल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकूण 7 वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली होती. वारजेतील रामनगर कॅनॉल रस्त्यावर सोमवारी 19 जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकीवरून गेलेल्या 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल होते.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments