Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई: रविंद्र धंगेकर-पोलिसांमध्ये झटापट, काँग्रेसच्या कामाचे...

पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई: रविंद्र धंगेकर-पोलिसांमध्ये झटापट, काँग्रेसच्या कामाचे श्रेय भाजप घेत असल्याचा आरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथील टाकी मनपाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात येणार होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या उद्घाटनाला विरोध दर्शवण्यात आला. तसेच, आमदार रविंद्र धंगेकर आणि पोलिसांमध्ये झटापटदेखील झाली. या वादानंतर रविंद्र धंगेकरांच्या नेतृत्वाखाली टाकीचे उद्घाटन झाल्याचे कार्यकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले.

भाजपची सत्ता असताना अनेक विकास कामांवर लक्ष देत कामं पूर्ण करुन घेतली, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्या उलट या टाकीचं काम आम्ही पूर्ण केलं, तरीही अजित पवार उद्घाटन का करत आहे?, असा प्रश्न उपस्थित करत आम्हीच टाकी उभारली असा दावा काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

लोकशाही शिल्लक राहिलेली नाही

रविंद्र धंगेकर म्हणाले- खोटं बोलावं पण रेटून बोलावं असं काम प्रशासन व भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांनी मला, माजी नगरसेवक, मंत्र्यांना अडवण्याचं काम केलं आहे. आता लोकशाही शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी धंगेकरांनी महापालिका अधिकारी आणि पोलिसांचा निषेधही केला.

काँग्रेसचा दावा खोटा-भाजप

मार्च 2016 मध्ये या टाकीचं काम सुरु झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये लगेच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले. 2017 ते 2022 पर्यंत टाकीचे काम पूर्ण झाले. या सहा वर्षात मात्र एकच वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती. तरीही काँग्रेस या टाकीचे काम आम्ही केल्याचा दावा करत आहे. हा दावा साफ खोटा असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. या टाकीसाठी साधारण 11 कोटी खर्च आला, असेही भाजपकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments