Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात काँग्रेसला मोठा धक्का..! रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार? शिंदेंना भेटून घेणार...

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का..! रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार? शिंदेंना भेटून घेणार निर्णय…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसला सोडचिठी देणार असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ते शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं. आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असून पक्षप्रवेशाबाबतची तारीख ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. अगोदरही रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांची भेट घेतली होती. तेंव्हाच ते काँग्रेस सोडून शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पक्ष सोडणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले..

एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करायचं आहे. आता काँग्रेस सोडत असताना वाईट वाटतं आहे. उदय सामंत यांनी आमच्याकडे या असं सांगितलं. माझा काही कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही. काँग्रेस पक्षावर कधीच नाराजी नव्हती. काँग्रेसने मला भरभरुन दिलं आहे. मात्र राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या भावनांचाही विचार करणं आवश्यक आहे. आज एकनाथ शिंदे यांना भेटून त्यानंतर निर्णय घेईल. असे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments