Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात काँग्रेसला धक्का; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पुण्यात काँग्रेसला धक्का; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसबा पेठ मतदारसंघातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर रवींद्र धंगेकर यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, मी दहा वर्ष शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केल आहे. यापूर्वी एकत्र परिवार म्हणून मी काम केलेलं आहे, आज पुन्हा परिवारामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा काम करण्याचा प्रवास सामंत साहेबांनी इथपर्यंत आणलेला आहे त्यासाठी त्यांचे आभार. शिंदे साहेब जसे कॉमन मॅन आहेत, सर्वसामान्य माणूस त्यांना भेटू शकतो तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न करेन अस आश्वासन देखील त्यांनी दिलं. त्याचबरोबर आपण जो आदेश द्याल त्याप्रमाणे शिवसेनेचे नाव कधी कमी होणार नाही असं काम करू असा शब्द देखील यावेळी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

याआधी 2023 च्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी आमदार हेमंत रासणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर धंगेकरांची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र मागील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आता लोकांना कळेल हु इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी केली. दरम्यान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडताना मला दुःख होत असल्याची भावना देखील व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments