इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्याच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून काँग्रेसचे झुंजार नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर लवकरच शिंदे सेनेच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. या चर्चावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली असून मी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बोलतो आणि जाताना मी लपून जाणार नाही असं त्यांनी सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या व्हाट्सअप स्टेटसवरूनही ते शिवसेनेत जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत असताना मला आवडलं म्हणून मी तो फोटो टाकला. मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे. या पक्षातच मी प्रामाणिकपणे काम केले आहे. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. माझे सगळे सोबत चांगले संबंध आहेत. महायुतीच्या नेत्यांसोबत ही माझे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्याकडून ऑफर देण्यात आली यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. दरम्यान ते शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याच्यां जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना जाताना मी लपून जाणार नाही असं त्यांनी सुचक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.