Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात कंपनीतील स्फोटानंतर घरात सिलिंडर फुटून 2 जण ठार: आग आटोक्यात, कंपनी...

पुण्यात कंपनीतील स्फोटानंतर घरात सिलिंडर फुटून 2 जण ठार: आग आटोक्यात, कंपनी होती 4 वर्षांपासून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आळंदीनजीक सोळू या गावात रस्त्यावरील कंपनीमध्ये असलेल्या कच्चा मालाचा स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांना आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे एका घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात २ ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली. संतोष त्र्यंबक माने (५०) आणि एका पुरुषाचा यात समावेश आहे.

सर्व जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोलू आळंदी मरकल रोड येथे स्पेसिफिक आलोय प्रा. लि. मध्ये स्फोट होऊन आग लागली होती. ही कंपनी सुमारे ४ वर्षांपासून बंद स्थितीत आहे. असे स्थानिकांकडून समजले. तसेच कंपनी व कंपनीच्या बाजूला स्फोट होऊन अंदाजे शंभर मीटर परिसरात आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे कंपनी ही गावठाण परिसरातील असल्यामुळे गवताच्या गंजी, गुरांचा चारा तसेच गुरांनादेखील हानी झाली. चारचाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच घरांचे नुकसान झाले. घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन १ ठार, तर ७ जण जखमी झाले.

पीएमआरडीए अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, आळंदी नगर परिषद, पुणे महानगरपालिका अग्निशमन दल या अग्निशमन वाहनांच्या तत्काळ मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली. तत्काळ मदत मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या घरे सुरक्षित राहिली.

आगीशी महावितरणचा संबंध नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

आळंदी नजीकच्या सोळू गावात (ता. खेड) गुरूवारी महावितरणच्या वितरण रोहित्राचा स्फोट होऊन काही घरांना आग लागल्याची माहिती चुकीची आहे. या आगीशी काहीही संबंध नाही तसेच वीजबिलाच्या थकबाकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments