Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात ऑनलाइन फसवणूकः महिलेसह दोघांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वा कोटींचा...

पुण्यात ऑनलाइन फसवणूकः महिलेसह दोघांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वा कोटींचा ऑनलाइन गंडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका महिलेसह दोघांची शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषाने दोघांची एक कोटी २३ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर तक्रारीनुसार अनोळखी सायबर चोरट्यांसह बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला पुण्यातील एरंडवणे भागातील भरतकुंज वसाहतीत राहण्यास आहे. सायबर चोरट्यांनी महिलेशी संर्पक करुन शेअर मार्केट मध्ये ऑनलाइन गुंतवणूक केल्यास चांगलाप्रकारे परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवले होते. चोरट्यांनी महिलेला आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या विविध बँक खात्यात वेळोवेळी ८८ लाख ६२ हजार १६८ रुपये भरले. परंतु चोरट्यांनी महिलेला कोणताही परतावा दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस रोकडे पुढील तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाची अनोळखी सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे आमिषाने संबंधीत ज्येष्ठ नागरिकाची ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध भागात ज्येष्ठ नागरिक राहण्यास असून सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी मोबाइलवर संर्पक साधून चोरट्यांनी शेअर बाजारात ऑनलाइन गुंतवणूक केल्यास अल्पकाळात चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे याबाबत पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments