Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात ऐन निवडणुकीत भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात ऐन निवडणुकीत भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून; राजकीय वर्तुळात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी प्रभाचीवाडी परिसरात घडली आहे. निलेश दत्तात्रय कडू (वय-३०, रा. सावंतवाडी, महागाव, ता. मावळ, जि. पुणे) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश दत्तात्रय कडू भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी होते. त्यांच्या खूनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच लोणावळ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी चौकशी केली आहे..

दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments