इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यातील तापमानात वेगाने वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे. काही भागात कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. मात्र आता पुणे आणि परिसरात हवामान बदल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ चढउतार नोंदविण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात घट होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहरात गेल्या काही दिवसात ४० अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यात शनिवारी घट होऊन 38 अंश सेल्सिअस कमाल तामानाची नोंद झाली. त्यानंतर आता पुणे आणि परिसरात आज कमाल तापमानात एकाने घट होऊन 37°c तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवली आहे. चढत्या पाऱ्याने नागरिक हैराण झाले असताना आता तापमानात घट होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
परिणामी उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा आता दिलासा मिळणार आहे. पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस आकाश मुख्यत : निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.