Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात अवतरला फर्जीतला आर्टिस्ट, चीनमधून कागद मागवला आणि छापल्या नोटा

पुण्यात अवतरला फर्जीतला आर्टिस्ट, चीनमधून कागद मागवला आणि छापल्या नोटा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील आयटी नगरी हिंजवडी मध्ये तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याचा उद्योग उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी सह एका अल्पवयीन गुन्हेगाराला अटक केली आहे. तिघांकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे छापलेल्या या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहून पोलिसही चक्रावले.त्यामुळे पपरराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा देखील तपास सुरू करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शुक्रवारी दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. तेव्हा मुख्य आरोपी अभिषेक राजेंद्र काकडे, ओंकार रामकृष्ण टेकम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयटी पार्क हिंजवडी मधून माण गावात जाणाऱ्या रस्त्यावर बोडकेवाडी फाटा येथे संशयितरित्या तिघेजण थांबले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटा आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन तिघांना जेरबंद केलं. तिघांकडे असलेल्या गाडीच्या डिकीमध्ये ५०० रुपयांच्या १ लाख २० हजार रुपये किमतीच्या चलनी नोटा आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या मात्र नोटावरील क्रमांक हे एक सारखेच असल्याचे दिसून आले आणि. त्यावरून या नोटा बनावट असल्याचे उघड झाले.

ऑनलाइन मागवले कागद

एका चिनी कंपनीच्या इ कॉमर्स वेबसाइटवून कागद मागवून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या. नोटेवर असलेली चांदीची तार, महात्मा गांधींची प्रतिमा यांचे एम्बॉसिंग असलेला कागद कुठून आला, तो कोणाकडून मिळाला याचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एकाच महिन्यात दुसऱ्यांदा बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघड झाला आहे.

इतक्या हुबेहूब नोटा कुठे छापल्या?

छपाई व्यवसाय चालत नसल्याने बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला. त्यासाठी ऑनलाइन कागद मागवला गेला. इतक्या हुबेहूब नोटा कशा छापल्या ? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या नोटांवर एम्बॉसिंग भारतातच झाले की इतर ठिकाणी याचा शोध पोलीस घेत आहेत. घरातच या नोटांची छपाई केली गेली. दोन लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या. यातील काही नोटा कटिंग करताना खराब झाल्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments