Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कारः वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले पैसे वेळत परत न...

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कारः वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले पैसे वेळत परत न केल्याने आरोपीचे कृत्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आजारी वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले हातऊसने पैसे मुदतीत परत न केल्यामुळे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये डांबून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. कहर म्हणजे बलात्कारानंतर पीडित मुलीस वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आल्याचाही किळसवाणा प्रकार या प्रकरणी उजेडात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत एका आरोपी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पूनम आकाश माने (22), आकाश सुरेश माने (24, दोघे रा. कात्रज गावठाण, पुणे) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार मुलगी अल्पवयीन आहे. आरोपी पूनम माने आणि मुलीची पूर्वीपासून ओळख आहे.

पीडित मुलीने वडिलांच्या आजारपणासाठी पूनम व तिच्या पतीकडून 30 हजार हातउसने घेतले होते. पण मुलीला आर्थिक अडचणींमुळे वेळीच हे पैसे परत करता आले नाही. यामुळे आरोपींनी तिला वारंवार धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी धनकवडी भागातील एका लॉजमध्ये मुलीस बळजबरीने घेऊन जाऊन तिला 10 ते 15 दिवस डांबून ठेवले. या ठिकाणी आरोपी आकाशने तिच्यावर सातत्याने बलात्कार केला.

त्यानंतर आरोपींनी तिला धमकावून तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडले. तिच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून आरोपींनी पैसे वसूल केले. अखेर आरोपींच्या त्रासामुळे घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पूनम मानेला अटक करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments