इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील कात्रज येथे एका ईव्ही दुचाकीच्या गोडाऊनला मोठी आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमक दलाच्या गाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )