इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून पुणे महानगरपालिकेतील महिलेचा छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा छळ फेब्रुवारी महिन्यापासून होत होता. या प्रकरणी महिलेने महानगरपालिकेतील वरिष्ठांकडे देखील तक्रार दाखल केली होती. मात्र, वरिष्ठांकडून याप्रकरणी दुर्लक्ष झाल्याने महिला अधिकाऱ्याला महिला आयोगाकडे धाव घ्यावी लागली.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुणे महानगपालिकेतील वैद्यकीय विभागातील महिला अधिकाऱ्याची फेब्रुवारी महिन्यापासून भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडून छळ आणि दमदाटीचा प्रकार होत होता. महिलेने महापालिकेतील वरिष्ठांकडे याप्रकरणी तक्रार देखील केली होती. मात्र, वरिष्ठांकडून याप्रकरणी दुर्लक्ष करण्यात आले, शेवटी महिलेने या छळाला कंटाळून महिला आयोगात धाव घेतली व याप्रकरणी तक्रार केली. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर जूनमध्ये महापालिकेने कारवाई केली आणि कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना महापालिका आवारात प्रवेशबंदी देखील घातली आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त राजेश भोसले यांच्याकडे तक्रार करूनही याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात झाली नसल्याने, तसेच याप्रकरणी टाळाटाळ केल्याने भोसले व वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.